Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : महानगर पालिका,एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल, वैद्यकीय शिक्षण व सुविधा आणि म्हाडा अंतर्गत नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्प नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित यंत्रणांना दिल्या.

येथील मुख्यमंत्री सचिवालयात (हैदराबाद हाऊस) शहरातील विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ,महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार माया इवनाते,आमदार मोहन मते आणि कृष्णा खोपडे,नागपूरच्या महापौर नीता ठाकरे,गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता,विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी यावेळी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत १ लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये झोननिहाय भाजी बाजार, मटन-मच्छी मार्केट,फूड मॉल व हॉकर झोन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ही कामे पूर्ण करताना पार्किंगची योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले त्यासाठी ‘एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’चा आधार घ्यावा व आवश्यक बदल करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पार्किंग बाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तोडगा काढावा अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी दिल्या.

नागपूर शहराचा विकास करताना येथील शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध टपऱ्या, पान मसाल्याची दुकाने तातडीने हटवावी, मुख्य रस्त्याच्या शेजारी करण्यात आलेले अतिक्रम तत्काळ काढावे आणि महामार्गावरील बेकायदेशीर व्यवसाय बंद करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

हेही वाचा –  जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासनाला ‘डिजिटल बळकटी’

सक्करदरा बाजार, सोख्ता भवन बुधवार बाजार आणि ५व्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची शहरातील कामे पूर्ण करताना आधी समस्या पुढे ठेवून सोडविण्याच्या दिशेने कार्य करण्या बाबतही यावेळी निर्देश देण्यात आले. ५व्या टप्प्या अंतर्गत शहरातील ९ झोनमध्ये ८९ की.मी.चे १३५ रस्ते प्रस्तावित आहेत.

शहरातील पाणी पुरवठ्या विषयी झालेल्या चर्चेत पाणी गळती थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत राज्यातील अन्य शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या आदर्श पद्धतींचा अभ्यास करून त्या आधारे व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट आणि डीग दवाखाना यांच्या पुनर्विकास करताना घ्यावयाच्या काळजी बाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

दाभा येथील इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरच्या स्थितीची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच विभागीय क्रीडा संकुला बाबत सौर ऊर्जेचा वापर करणे, वेळोवेळी कामाची गुणवत्ता तपासणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, प्रशासकीय इमारत, क्रीडांगण उभारणे आदी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली व काही मागण्या आहे प्रस्तुत करण्यात आल्या.

यशवंत स्टेडियम पुनर्विकास प्रकल्प, नाग व पोहरा नदी प्रकल्पांची प्रगती, वाढत्या लोकसंख्येसाठी भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन,पावसाळी नाले व सांड पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत चर्चा झाली.काचीपुरा कृषी महाविद्यालय परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबतही चर्चा झाली.

या बैठकीत शहरातील विकास कामाशी संबंधित महानगर पालिका,महाराष्ट्र -राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. नागपूर (मिहान),क्रीडा विभाग,वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button