Breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus | नाशिकमध्ये आढळले 38 नवीन रुग्ण

नाशिक | जिल्ह्यात आज नवीन 38 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रेसतांचा आकडा 559 झाला आहे. आज आढळून आलेल्यामध्ये 21 रुग्ण मालेगावातील आहेत. तर नाशिक शहरातही 13 रुग्ण वाढले आहेत. यात सातपूरमध्ये 8, सिडकोत 2, पंचवटीतील हिरावाडीत 1, श्रीकृष्ण नगरमध्ये 1 आणि पाथर्डी फाटा तेथे 1 रुग्ण आहे तर सोलापूरचा एक आहे.

उर्वरित जिल्यात विंचूरमध्ये 2 आणि दिंडोरी तालुक्यातील इंदोरेतील 1 रुग्ण, असे 38 रुग्णाची भर पडली आहे. नाशिक शहरात कोरोनाचा धोका वाढला असुन आता तर या विषाणूने दिंडोरी तालुक्यातही शिरकाव केला आहे. यापूर्वी कोरोनाचे निफाड, सिन्नर, नांदगाव (मनमाड), चांदवड, सटाणा, दाभाडी (मालेगाव ग्रामीण) मध्ये शिरकाव केलेला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button