Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
गणेशोत्सवात PMPML प्रशासनाला १९ कोटी रूपयांचे उत्पन्न

पिंपरी : गणेशोत्सवात PMPML प्रशासनाने घसघशीत कमाई केली आहे. पीएमपी प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीएमपीचे उत्पन्न तब्बल २४ लाखांनी वाढले आहे.
हेही वाचा – ‘महाराष्ट्रात जे नेते नको आहेत त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा’; जयंत पाटील
यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पुण्यात रात्रभर PMPML बससेवा सुरू होती. त्यामुळे भाविकांना वेळेवर बाप्पाचं दर्शन घेता आलं. गणेशोत्सवात पुणे शहरासह उपनगरात PMPML च्या ६७२ अतिरिक्त बस सुरू होत्या. या बसेसच्या माध्यमातून पीएमपी प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.





