Breaking-newsपिंपरी / चिंचवड

विहिंपच्या शोभायात्रेप्रकरणातील गुन्हे मागे घ्या – विवेक कुलकर्णी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या शोभायात्रेत मुलींच्या हातातील बंदुका या प्रतिकात्मक होत्या. त्यामुळे आर्म ऍक्ट लागू होत नाही. तसेच पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुढील आठवड्यात मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे.

आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत बोलताना कुलकर्णी म्हणाले की,  पोलिसांच्या सूचनानुसार विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीकडून सात दिवसांच्या वर्गामध्ये प्रतिकात्मक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले गेले. अंकुश चौक ते ठाकरे मैदान यमुनानगर येथील शोभा यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने निगडी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे सोबत दिले होते.

यावेळी पोलिसांचा ताफा ही  होता. पोलिसांनी पदाधिकाऱ्यांसोबत वाद  घातला.  दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मुलींकडे खऱ्या बंदुका असून त्या हवेत गोळीबार करत  असल्याचे सांगितले. मात्र ती प्रतिकात्मक शस्त्रे असल्याचे आम्ही पोलिसांना सांगितले.  एअर रायफलवर  कोणत्याही अॅक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही. काही अघटीत घडले असते, तर त्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली असती का? असा सवाल कुलकर्णी यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button