नागरिकांनो.. घाबरु नका, योग्य ती काळजी घ्या – आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना व्हायरसला भयभीत न होता, सतर्क राहून आपल्या सर्वांना या संकटाचा मुकाबला करायचा आहे. कोरोना बाबत योग्य काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना केले आहे.
कोरोनाने महाराष्ट्रातील पुण्यासह राज्यभर शिरकाव केला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. महापालिकेने भोसरी व पिंपरीत विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर सात खासगी रूग्णालयात 48 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रसार ‘ड्रॉप’ लेन च्या माध्यमातून होतो. त्यासाठी वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वैद्यकीय सल्ल्यानुसार मास्कचा वापर करावा असा सल्ला शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.





