breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड : त्रिवेणीनगर-तळवडे रस्ता ‘मृत्यूचा सापळा’

पोलिसांचे संख्याबळ वाढवा : माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांची मागणी

पिंपरीः त्रिवेणीनगर ते तळवडे रोड या रस्त्यावर होणारे वारंवार अपघात तसेच वाहतूक विभागातील पोलीस व वार्डन यांची असलेली अपुरी संख्या वाढवण्याची मागणी माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर व तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर भागातील ग्रामस्थ यांच्यावतीने पिंपरी-चिंचवड, पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चौबे साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच तळवडे गावाचा जो भाग देहूरोड पोलीस स्टेशनला जोडलेला आहे, तो भाग चिखली पोलीस स्टेशनला जोडण्यात यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

याच आठवड्यात वृषाली बाजीराव भालेकर तसेच ताथवडे येथील रहिवासी नवनाथ भानुदास गायकवाड यांना जीव गमवावा लागला. त्याचप्रमाणे एक अनोळखी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल असून, कोमामध्ये उपचार घेत आहे. त्या रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक पोलीस व वार्डन जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रकारची मागणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली, असून, त्यांनी लवकरात-लवकर सक्षम असे वाहतूक पोलीस व अनुभवी वार्डन देण्याचे मान्य केले. तसेच मा.आयुक्त साहेब ज्या कालावधीमध्ये ट्रॅफिकची वर्दळ जास्त असते त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या पावत्या न करता वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करावी, अशा प्रकारच्या सूचना वाहतूक विभागाचे पी.आय. सुनील टोणपे यांना देण्यात आल्या. लवकरच त्या संदर्भात कार्यवाही केली जाईल, अशा प्रकारचे आश्वासन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नगरसेवक शांताराम बापू भालेकर व त्यांच्या समवेत असणाऱ्या शिष्टमंडळाला देण्यात आले.

हेही वाचा – साताऱ्यातील धोम धरणाच्या कालव्याला भगदाड, ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी

त्याचप्रमाणे तळवडे विभागाचा जो भाग देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, तो भाग डी.सी.पी. काकासाहेब डोळे यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करून तो भाग चिखली पोलीस स्टेशनला जोडण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या ही मागणी तळवडे गावचे युवा नेते अमोल भालेकर यांच्याद्वारे करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रुपीनगर त्रिवेणीनगर-तळवडे या विभागातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रस्तावित रस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा करून विकसित करावे, अशा प्रकारच्या सूचना रुपीनगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणदादा थोपटे यांच्यामार्फत मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे तळवडे-त्रिवेणीनगर-रुपीनगर परिसरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये २२ ते २५ जण अपघातामुळे मृत्युमुखी पडल्या कारणाने या भागातील बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते के.डी. वाघमारे स्वतःची नात ज्योतिबानगर येथील कंपनीत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याचे दुःख व्यक्त केले.

याप्रसंगी तळवडे वाहतूक विभागाचे पी.आय.सुनिल टोणपे, त्याचप्रमाणे निगडी वाहतूक विभागाचे पी.आय.शंकर बाबर, ए.सी.पी. सतीश कसबे उपस्थित होते. याप्रसंगी निवेदन देण्यासाठी तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर भागातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

त्रिवेणीनगर-तळवडे हा रोड आयटी पार्क, छोटे लघुउद्योग या परिसरातील ग्रामस्थ निघोजे MIDC, आंबी MIDC, चाकण MIDC, शिंदे-वासोली MIDC या विभागांना जोडला गेल्या असल्या कारणाने वाहतुकीची वर्दळ त्रिवेणीनगर-तळवडे रोड वरती मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्या रोडवरती वारंवार अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत. वाहतूक विभागातील पोलीस व वार्डन यांच्या अपुऱ्या संख्येमुळे हे अपघात वाढताहेत. तसेच वाहतूक कोंडीचादेखील त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतोय. परिणामी वाहन धारकांना मनस्ताप होतोय. पोलिस आयुक्तांना विनंती केली आहे की, या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी. त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसेल व अपघातदेखील होणार नाहीत.

माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button