क्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शालेय जिल्हास्तरीय कबड्डीत राजमाता जिजाऊला सलग आठव्यांदा विजेतेपद

ताराबाई मुथा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंचवड या संघाचा 27-14 अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव

पिंपरी : शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने सलग आठ वेळा विजेतेपद पटकाविले. तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे या स्पर्धा पार पडल्या. अंतिम सामन्यात ताराबाई मुथा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंचवड या संघाचा 27-14 अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव करत विजेतेपद संपादन केलेले आहे.

सदर संघातील आदिती दौंडकर, अफरीन खान, हितांशी खेडेकर यांनी आक्रमक चढाया करत तसेच डावा कोपरा चांदणी गौतम, उजवा कोपरा रक्षक आदिती कडुसकर, डावा पाचवा मध्य रक्षक मुक्ता वाकुडे, निशा जाधव यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. उपांत्य फेरीतील रामचंद्र गायकवाड ज्युनिअर कॉलेज दिघी या संघाचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सदर संघात पुजा जाधव, निता जाधव, निशा जाधव, दुर्गा केंद्रे, पुनम जाधव, नागिन बेलपाडे, अफ्रिन खान , आदिती दौंडकर, चांदणी गौतम, हिमांशी खेडेकर, आदित्य कडुसकर, मुक्ता वाकुडे या सर्व खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची अहमदनगर येथे होणार्‍या शालेय विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.

या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचेे अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button