breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड : विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू : डॉ कीर्ती धारवाडकर

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये शैक्षणिक वर्षाचा 'आरंभ'

पिंपरी : विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शैक्षणिक संस्थेचे ध्येय असावे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवताना देशाचा विकास करावा असे, आवाहन एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी केले.

निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा ‘आरंभ २०२३’ स्वागत समारंभ आयोजित केला होता. यावेळी डॉ. धारवाडकर यांनी मार्गदर्शन केले. विविधता आणि सर्व समावेशक नेतृत्व या विषयावरील चर्चासत्रा मध्ये भरत ओसवाल, उत्कर्षा राजेपांधरे, वैष्णवी देशपांडे यांनी महिला सशक्तिकरण आणि नेतृत्वगुण याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एस. बी. पाटील मधील यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिथिलेश कुलकर्णी, अभिषेक राव, अनुजा कुलकर्णी, सुयोग ठाकरे, अश्विनी महाबळ, साहिल सावळे या माजी विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचा एमबीए मधील प्रवास, स्वप्न आणि यशस्वी होण्याचा राजमार्ग सांगितला. डॉ. जयश्री फडणवीस आणि पराग औटी यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, मनोधैर्य, वर्तणूक, नेतृत्व गुण याविषयी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.

रवी बोदाणी, संजय बोदाणी, प्रो. डॉ. दिनेश गुप्ता, डॉ. शितलकुमार रवंदळे, अंबिका मसालेच्या संचालिका कमल परदेशी, अजित चीगतेरी, संतोष घाटपांडे, भूषण हेर्लेकर, मधुरा कांबळे, सुभेदार चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, अभिनेते समीर धर्माधिकारी, अभिनेत्री नुपूर दैठणकर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरंभ २३ या स्वागत पर तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये प्रथम वर्ष एमबीएच्या २४० विद्यार्थ्यांना विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button