breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ३२१ जणांना कोरोनाची बाधा, १४२ महिलांचा समावेश

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ५) रोजी ३२१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात १७९ पुरुष आणि १४२ महिलांचा समावेश आहे. तसेच निगडी-यमुनानगरचे भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांना शुक्रवारी (दि. ३) रोजी कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विरोधात लढणा-या कर्मचा-यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉक्टर, नर्सलाही लागण झाली आहे. भोसरी, आकुर्डी रुग्णालयातील वॉर्डबॉय, आया, मावशी यांनाही बाधा झाली आहे. पालिका मुख्यालयात कार्यरत असलेल्या उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, कर संकलन कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य विभागातील साफसफाई कर्मचा-यांनाही बाधा झाली आहे.

आज पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीबाहेरील मरकळ, मुळशी, लोणी काळभोर कामटेकर रोड, आनंदनगर मामुर्डी, शिरुर, बिबेवाडी, हिंजवडी, डोंबिवली, गांधीनगर देहूरोड, खेड, कर्वेनगर पुणे, निघोजे, संगमवाडी खड़की, कात्रज येथील तेरा पुरुष आणि दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

आज पिंपरी चिंचवडमधील केशवनगर, चिंचवड (पुरुष, वय -६८ वर्षे), बाबासाहेब आंबेडकरनगर, पिंपरी ( स्त्री, वय- ४९ वर्षे), क्षितीजनगर, प्राधिकरण (स्त्री, वय -६२ वर्षे), बोपखेल ( स्त्री, वय- ५४ वर्षे) या चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

शहरातील रुग्णांची संख्या ४२८८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १६७४ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २५४३ वर पोहोचली आहे.

आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण पिंपरीगांव, विठ्ठल रुक्मिणी कॉलनी काळेवाडी, फुलेनगर भोसरी , शांतीनिकेतन आकुर्डी , अजंठानगर संभाजीनगर शिवाजीपार्क चिखली , तानाजीनगर चिंचवड , नेहरुनगर कुदळेचाळ पिंपरी , शिंदेनगर सांगवी , प्रभातनगर पिंपळेगुरव मेहत्रेवस्ती, सुदर्शनगर चिखली , ताम्हाणेवस्ती , कासारवाडी, गवळीचाळ भोसरी, देहूरोड, तळवडे , त्रिवेणीनगर शिवतेजनगर लक्ष्मीनगर निगडी , शाहूनगर , जयभीमनगर दापोडी म्हाडा मोरवाडी , बालाजीनगर साईनाथनगर निगडी , विद्यानगर, संत तुकारामनगर पिंपरी, बौध्दनगर, आनंदवन थेरगांव, रुपीनगर, महादेव आळी, दापोडी, इंद्रायणीनगर भोसरी, गांधीनगर पिंपरी , वल्लभनगर पिपरी, च-होली, विठ्ठलवाडी आकुर्डी, खंडोबामाळ भोसरी, भाटनगर, मोरेवस्ती चिखली, चाफेकर चौक चिंचवड, सम्राट हो. सोसा. निगडी, रामनगर चिंचवड, प्रसाद अपार्टमेंट चिंचवड, मिनिंदनगर पिंपरी, कैलासनगर थेरगांव, शिवले विटभट्टी चिंचवड, साईनाथनगर पिंपळे गुरव, नखातेनगर रहाटणी, रमाबाईनगर पिंपरी, शरदनगर चिखली, भोईर आळी चिंचवड, तालेरानगर चिंचवड, गुळवेनगर भोसरी, दगडू पाटीलनगर थेरगांव, लांडेवाडी भोसरी, भैरवनाथनगर पिंपळेगुरव, मोहननगर चिंचवड , सोनाई अपार्टमेंट चिंचवड , साईपार्क दिघी , अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरूनगर, हरगुडेवस्ती चिखली, अत्तार विटभट्टी दापोडी, संत ज्ञानेश्वरनगर थेरगांव, विजयनगर काळेवाडी, बिजलीनगर, सेक्टर-२७ निगडी, चैत्रेबा सोसा, सांगवी, बापूजीबवा मंदीर निगडी, काकडे रेसिडेन्सी चिंचवड, आदर्शनगर काळेवाडी, विकासनगर किवळे, सत्संगभवन काळेवाडी, वल्लभनगर पिंपरी, रामनगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, गणेशनगर पिंपरगांव, संत तुकारामनगर कुदळेवस्ती मोशी, फुलेनगर, बो-हाडेवस्ती च-होली, साने चौक चिखली, शिवाजीपुतळा दापोडी, सीएमई बोपखेल, ज्ञानसागर हॉस्पीटल भोसरी, रामनगर भोसरी, रोशनगार्डन भोसरी, बो-हाडेवस्ती चिखली, नेहरुनगर, कैलासनगर थेरगांव, गुलाबनगर दापोडी, पिंपळेगुरव, बुरुडेवस्ती च-होली, कुंजीर बिल्डिंग कासारवाडी, जुनी सांगवी, महादेवनगर भोसरी, पीमीएमटी चौक भोसरी, रहाटणी, मोशी, थेरगांव, पांजरपोळ भोसरी, कस्पटेवस्ती, मोरवाडी पिंपरी, विठ्ठलनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, प्राधिकरण निगडी, विनोदेवस्ती वाकड, मरकळ , दिघी , भक्तीशक्ती निगडी , पिंपळे निलख, आनंदनगर येथील रहिवासी आहेत.

आज निगडी, पिंपळे निलख , पवारवस्ती , आदर्शननगर दिघी , थेरगाव, पिंपळेगुरव, मिलिंदनगर पिंपरी, पवारदस्ती दापोडी , अजंठानगर फुलेनगर पिंपरी , आज सिध्दार्थनगर दापोडी , सानेवस्ती चिखली, नेहरूनगर पिंपरी, इंदिरानगर चिंचवड, दिघीरोड भोसरी, सांगवी, पाटोळे चाळ , कासारवाडी, विकासनगर देहूरोड, जुनी सांगवी, दळवीनगर निगडी, भोसरी, काळेवाडी , मोशी , जुनी सांगवी, म्हाडा पिंपरी, आगरवाल चाळ खराळवाडी, पवनानगर काळेवाडी , मोरवस्ती चिखली, इंदिरानगर चिंचवड, बिजलीनगर चिंचवड, नेहरुनगर , मोशी , वाकड तानाजीनगर चिंचवड , शगुनचौक पिंपरी , भोसरी , काळेवाडी पिंपरी , प्राधिकरण निगडी , रहाटणी , बोपखेल, कस्पटे वस्ती, तापकिरनगर काळेवाडी , वैदुवस्ती पिंपळेगुरव , गांधीवसाहत नेहरुनगर च – होली रिव्हररोड पिंपरी , गौतमनगर पिंपरी , डिलक्स रोड पिंपरी, लिंकरोड पिंपरी, शिववाघेरे चाळ पिंपरी, गणेशनगर नेहरुनगर, गांधीनगर पिंपरी, काटेपूरम चौक पिंपळेगुरव, लांडेवाडी भोसरी, मरकळ, भाटनगर, पिंपरी, चिखली जाधववस्ती, इंदिगगांधी नगर, पिंपळे निलख, भोईआळी चिंचवड, विशालनगर पिंपळे निलख, खडकी , हिंजवडी, येरवडा, दौंड, मंगळवारपेठ पुणे , बिबेवाडी, जुन्नर , बोपोडी कात्रज, येथील रहिवामी असणाऱ्या कोविड – १९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button