breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारण

पिंपरी-चिंचवड : भाजपाचे एकनाथ पवार यांच्या हाती अखेर ‘मशाल’

मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवबंधन बांधले.

भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्याचा पवार यांनी नुकताच  राजीनामा दिला होता. तसेच,  आपण दि. 27 ऑक्टोबर रोजी पुढील भूमिका जाहीर करू असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हेते. 

एकनाथ पवार हे पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी एकदा भाजपाच्या उमेदवारीवर भोसरी विधानसभेची निवडणुकही लढविली होती. त्याचबरोबर पक्षाचे सभागृह नेते म्हणुन त्यांनी पक्षासाठी चांगली जबाबदारी पार पाडली होती. पक्षातील ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांचे ते निकटवर्ती आहेत. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांचेशी त्यांचे चांगले संबंध आहेत. स्मृती ईराणी यांच्या अमेठी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्यावेळी त्यांनी तेथे जावून महत्वपूर्ण कामगीरी पार पाडली होती. 

दरम्यान, एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, एकनाथ पवार हे लोहा कंधार विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढवू ईच्छीत आहेत. या या मतदार संघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button