breaking-newsराष्ट्रिय

‘फ्युचर ग्रुप’ रिलायन्सच्या ताब्यात; २४ हजार ७१३ कोटींना खरेदी केला

नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजने रिटेल किंग किशोर बियाणी यांचा रिटेल बिझनेस असलेला फ्युचर समूह खरेदी केला आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी हा समूह २४ हजार ७१३ कोटींना खरेदी केला आहे. त्यामुळे बिग बाजारसह या समूहाचा होलसेल, लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंग हा सर्व कारभार आता रिलायन्सकडे जाणार आहे. त्यामुळे रिलायन्सची उपकंपनी रिलायन्स रिटेल ही रिटेल क्षेत्रातील एक बडी कंपनी बनली आहे.

भारतात ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या आणि रिटेल क्षेत्रात नाव कमावलेल्या बिग बाजार, ईझीडे आणि एफबीबीच्या देशातील ४२० शहरांमध्ये १८०० पेक्षा अधिक शाखा आहेत. मात्र हा समूह बियाणी यांना विकावा लागल्यामुळे हे सर्व स्टोअर आता रिलायन्सच्या मालकीचे झाले आहेत. दोन्ही उद्योगांनी या व्यवहारावर शिक्कामोर्तब केले आहे, असे रिलायन्सने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

फ्युचर समूह आणि रिलायन्स यांच्यात झालेल्या व्यवहाराप्रमाणे फ्युचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाईल लिमिटेड अंतर्गत येईल. रिलायन्स १२०० कोटींची प्रेफरेंन्शियल इश्युद्वारे गुंतवणूक करेल आणि फ्युचर एन्टरप्रायजेस लिमिटेडमधील ६.०९ टक्के हिस्सा खरेदी करील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button