ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक वसंतराव खांडगे यांचे निधन

तळेगाव (Pclive7.com):- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, ऐतिहासिक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, हभप वसंतराव (दादा) मामासाहेब खांडगे (वय ८९) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून खांडगे (दादा) यांनी धुरा सांभाळली. १९७४ साली नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष ठरली. गवत बाजाराचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून ते ख्यातनाम होते. अत्यंत प्रामाणिक, शांत, संयमी, मितभाषी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले. ते उत्कृष्ट मृदुंग वादक आणि भजनकरी देखील होते.

त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सूना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक गणेश खांडगे यांचे वडील तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व उद्योजक स्वानंद खांडगे यांचे ते चुलते होत. अंत्यविधी बुधवारी (दि.७) सकाळी अकरा वाजता तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button