breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

ऑस्करमध्ये ‘ओपनहायमर’ची बाजी, ऑस्कर विजेत्यांची पूर्ण यादी वाचा

Oscars 2024 | मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली असून दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा ९६ व्या अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. ऑस्कर सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी वाचा..

एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एमी स्टोनला मिळाला. ‘पूअर थिंग्ज’मधील तिच्या अभिनयासाठी ३५ वर्षीय अभिनेत्रीने प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.

‘ओपेनहायमर’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपेनहायमर’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

ख्रिस्तोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

ख्रिस्तोफर नोलनने ‘ओपेनहायमर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कार जिंकला.

सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

सिलियन मर्फीने ‘ओपेनहाइमर’मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला आहे.

बिली इलिशला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार

‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्यासाठी बिली इलिशने सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर जिंकला.

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर ऑस्कर ‘ओपनहायमर’ला

Ludwig Göransson ला ‘ओपनहायमर’ साठी या वर्षीचा सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ ने जिंकला ऑस्कर

‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ ने ऑस्कर २०२४ मध्ये आणखी एक पुरस्कार जिंकला. त्याला सर्वोत्कृष्ट साउंडचा पुरस्कार मिळाला.

‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ ला मिळाला ऑस्कर

‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकला.

‘ओपेनहायमर’ला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर ‘ओपनहायमर’ चित्रपटाला मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कोणती?

२० डेज इन मारियुपोलने या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फील्मचा ऑस्कर जिंकला.

‘द लास्ट रिपेअर शॉप’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टफिल्मचा ऑस्कर

‘द लास्ट रिपेअर शॉप’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टफिल्मचाऑस्कर मिळाला. याचे दिग्दर्शन बेन प्राऊडफूट आणि क्रिस बॉवर्स यांनी केले होते.

फिल्म एडिटिंगचा ऑस्कर ‘ओपनहायमर’ला

‘ओपनहायमर’ला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा    –    पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन 

‘गॉडझिला मायनस वन’ ला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर

‘गॉडझिला मायनस वन’ ला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर मिळाला!

रॉबर्ट डाउनी ज्युनियर ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ‘ओपेनहायमर’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.

‘झोन ऑफ इंटरेस्ट’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार

युनायटेड किंगडमने ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ऑस्कर जिंकला.

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा ऑस्कर कुणाला?

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ‘पुअर थिंग्ज’ ची डिझायनर होली वॉडिंग्टनला ऑस्कर देण्यात आला.

‘पुअर थिंग्स’ला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा पुरस्कार

‘पुअर थिंग्स’ला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट केशभुषा आणि मेकअपसाठी अकादमी पुरस्कार कोणाला?

सर्वोत्कृष्ट केशभुषा आणि मेकअपसाठी ‘पुअर थिंग्ज’ ला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

‘अमेरिकन फिक्शन’ला सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा पुरस्कार

कॉर्ड जेफरसन लिखित ‘अमेरिकन फिक्शन’ने सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार जिंकला.

‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार

जस्टिन ट्रायट आणि आर्थर हरारी यांना ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’साठी सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे.

‘द बॉय अँड द हेरॉन’ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचरचा पुरस्कार

‘द बॉय अँड द हेरॉन’ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. याचे दिग्दर्शन हायाओ मियाझाकी आणि तोशियो सुझुकी यांनी केले होते.

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म – ‘वॉर इज ओव्हर’

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘वॉर इज ओव्हर’ या चित्रपटाचा मिळाला.

दा’वाइन जॉय रँडॉल्फला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

दा’वाइन जॉय रँडॉल्फने ‘द होल्डओव्हर’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला आहे. पुरस्कार स्वीकारताना ती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button