breaking-newsपिंपरी / चिंचवड

Pimple Saudagar : ‘लिनिअर गार्डन’कडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, तत्काळ दुरुस्ती करा – संदीप काटे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागरच्या कोकणे चौक ते स्वराज गार्डन दरम्यान पावणेदोन किलोमीटर परिसरात पिंपरी चिंचवड महापालिकेने लिनिअर गार्डन उभारले आहे. कोकणे चौक ते गोविंद चौक दरम्यानचे ‘गार्डन’ सुस्थितीत आहे. उर्वरित विश्वशांती कॉलनी गावठाण लगत विकसित केलेल्या ‘लिनिअर गार्डन’मध्ये मात्र, अवकळा पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने विश्वशांती कॉलनी गावठाण लगत विकसित केलेले ‘लिनिअर गार्डन’ पूर्वरत करावे. त्याच्या देखरेखीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी पिं. चिं. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात काटे यांनी म्हटले आहे की, पिंपळे सौदागर हा शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला परिसर आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित पर्यावरणपूरक ‘लिनिअर अर्बन गार्डन’ची पिंपळे सौदागर परिसरात उभारणी केली. कोकणे चौक ते गोविंद चौकापर्यंत विस्तारलेले हे ‘गार्डन’ पिंपळे सौदागरचे भूषण आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच कोकणे चौक ते गोविंद चौकाच्या नियोजित व उर्वरित मोकळ्या जागेवर विस्तारित ‘लिनिअर गार्डन’ विकसित केले. त्यामध्ये पदपथ, विजेचे खांब, विसाव्यासाठी टेंट, वृक्ष लागवड करण्यात आली.

मनपा प्रशासनच्या दुर्लक्षामुळे गेल्या आठ महिन्यांपासून पाण्याअभावी येथील झाडा-फुलांची रोपटे जळून गेली आहेत. ‘गार्डन’मध्ये वाळलेले गवत, कचरा, जनावरांचे मलमूत्र, विष्ठा त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेने काही कोटींची उधळपट्टी करून, विकसित केलेल्या या ‘गार्डन’ची लवकरच कचराकोंडी होऊ नये, त्यासाठी महापालिका आयुक्तांनी त्वरित पाऊले उचलावीत. ‘गार्डन’मध्ये स्वच्छता, लावलेल्या वृक्षांच्या रोपट्यांना पाणी द्यावे, हिरवळीसाठी प्रयत्न करावेत. मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध करावे, लाकडी खुर्च्या बसवाव्यात व ‘गार्डन’ च्या देखरेखीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी, असे या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे.

संबंधित ‘गार्डन’ ची समस्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या निदर्शनास आणून दिली. तात्काळ महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले. विश्वशांती कॉलनी गावठाण लगत विकसित केलेले ‘लिनिअर गार्डन’ पूर्वरत करण्याच्या सूचना उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना नाना काटे यांनी केल्या आहेत.

– संदीप काटे (पिं. चिं. शहर राष्ट्रवादी कार्यकर्ता)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button