breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपामध्ये ‘अस्तनीतील निखारे’ : सरचिटणीस राजू दुर्गे म्हणतात..‘गद्दारांना’ आता क्षमा नाही!

शहर भाजपविरोधी कारवाया करणाऱ्या स्वपक्षीयांना इशारा

‘आमचे काय वाकडे कराचे ते करा’…डबल ढोलकी खपवून घेणार नाही

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे सत्ता आहे. मात्र, तीन वर्षांत भाजपमधीलच काही नगरसेवक पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असून, वैयक्तिक उखाळ्या-पाखाळ्यातून राजकारण करणाऱ्याच्या भूमिकेमुळे पक्षाला फटका बसत आहे. याचा खरपूस समाचार पक्षाचे सरचिटणीस राजु दुर्गे यांनी घेतला आहे.

शहर भाजपामधील अस्तनीतील निखारे आहेत. त्यांना आता क्षमा नाही. गद्दारांना माफी नाही, असा इशारा देत. दुर्गे यांनी म्हटले आहे की, भाजप प्रवेश 2015 ला, भाजप पदाधिकारी 2016 ला, भाजप नगरसेवक 2017 ला, महापालिकेतील सर्वात मोठे लाभाचे पद 2017 ला, विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात बंडखोरी 2019 ला, एवढे उरावर घेऊन सुद्धा आजही भाजप मध्ये सुरक्षित, आणि तरीही भाजपच वाईट ? आता काय भाजपने यांच्या घरी पाणी भरायचे का ? कोण अहात तुम्ही ? वय काय तुमचे भाजप मधील ? का सहन करायचे आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी तुमचे हे स्वार्थी उद्योग ? आज पर्यंत तुम्ही जे काही केले केले ते इच्छा असो वा नसो पक्ष म्हणुन स्वीकारले ! पण आता नाही ! आता जो स्वतःला फक्त लाभासाठी भाजपवाला म्हणवतो आणि भाजप विरोधात काम करतो, त्याला आम्ही सोडणार नाही ! त्याला जशास तसे उत्तर देणार ! भले पक्षाने आमच्यावर कार्यवाही केली तरी बेहत्तर, असेही दुर्गे यांनी म्हटले आहे.

***

भाजपच्या जीवावर मोठे झाले आणि बोंबा का मारता?

 आमच्या भाजपच्या जिवावर मोठे झलेल्यांनो याद राखा, ज्या गतीने आमच्या भाजपने तुम्हाला मोठे केले तो भाजप गद्दारांना त्यांची जागा पण त्याच गतीने दाखवतो ! गद्दारांना माफी नाही, आता हिच नीती आमची असणार ! ज्या पक्षाच्या नावावर, चिन्हावर निवडुन यायचे, प्रचंड मोठमोठे लाभ घ्यायचे, आणि नंतर मग त्याच पक्षाच्या आणि पक्षनेत्यांच्या नावाने जाहिररित्या बोंबा मारायच्या, अशी डबल ढोलकी नीती, नाही सहन करणार, कदापी नाही सहन करणार ! कोणाला आमचे काय वाकडे करायचे ते बिनधास्त करा, आम्ही पण काही मेल्या आईचे दुध प्यायलेलो नाही, आम्ही कट्टर आणि कट्टर भाजपवाले आहोत, असेही राजु दुर्गे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button