breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उस्मानाबादेत कोरोनाचे 43 रुग्ण, मंगळवारी अकरापैकी सातजणांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’

उस्मानाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी

तब्बल सोळा दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. मंगळवारी प्रलंबित असलेल्या 11 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 7 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह  आले आहेत. यामध्ये 5 जण नवीन कोरोनाबाधित असून दोघा कोरोनाबाधितांचे अहवाल पूर्वीच पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर दोघांचे अहवाल संदिग्ध असून उर्वरित दोघे निगेटिव्ह आहेत. मुंबई, पुणे रिटर्न आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आतापर्यंतचे अहवाल पाहता समोर आले असून उस्मानाबादकरांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. 

बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये जेवळी (ता. लोहारा) येथील पूर्वीच्याच दोघांचे असून ते यापूर्वीच्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. तिघेजण कार्ला (ता. तुळजापूर) येथील असून तिघेही मुंबईहून आलेले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथे आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित असून मुंबईहून परत आलेली आहे. केसरजवळगा (ता.उमरगा) येथेही एक कोरोनाबाधित आढळला असून तो यापूर्वीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहे. 

जिल्ह्यात  मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या आता 43 वर गेली होती. त्यात मंगळवारी प्रलंबित असलेल्या 11 पैकी नवीन 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर जेवळी येथील दोघे पूर्वीचेच पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या आता 48 वर गेली आहे. यापैकी 8 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलेले आहे. तर 40 जणांवर उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे सुरूवातीला आढळून आलेले तीन कोरोनाबाधित उपचारानंतर बरे झाले. तब्बल 37 दिवस एकही कोरोनाबाधित आढळून न आल्यामुळे 11 मे पासून लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली. मात्र त्याच दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याचे दिसत आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या सात व्यक्ती पैकी पाच नवीन रुग्ण असून दोन रुग्णाचे अहवाल पूर्वीच पॉझिटीव्ह आलेले आहेत. पाच नवीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील तीन रुग्ण असून ते मुंबई रिटर्न आहेत. तसेच धुत्ता येतील एक रुग्ण असून तो पूर्वीच्या  रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील असून तोही मुंबई रिटर्न आहे. तर एक रुग्ण हा केसर जवळगा येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील आहे, अशी माहिती डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button