पिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी

पिंपरी l प्रतिनिधी

तरुणासोबत काढलेले फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल करून अल्पवयीन मुलीची बदनामी केली. ही घटना केळगाव हनुमानवाडी येथे 25 फेब्रुवारी 2022 रोजी उघडकीस आली.

श्रीमंत प्रकाश बिरादार असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै 2021 या कालावधीत फिर्यादी अल्पवयीन मुलीने आरोपीसोबत एकमेकांच्या गळ्यात हात घालून फोटो काढले होते. ते फोटो आरोपीने सोशल मीडियावर अपलोड करून त्याखाली ‘My love you, life time wife’ अशी कमेंट टाकत फिर्यादीची बदनामी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button