breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आमदार लांडगे ‘ऑनफिल्ड’

  • तळवडे येथील १०० एमएलडी जलवाहिनीच्या कामाची पाहणी

  •  महापालिका प्रशासनाची तयारी, डिसेंबर अखेर काम पूर्ण होणार

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे. यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे ‘ऑनफिल्ड’ उतरले आहेत.
विशेष म्हणजे, महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून तळवडे येथील १०० एमएलडी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. बुधवारी आमदार लांडगे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली.

वाचा :-पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता ५० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती- आयुक्त राजेश पाटील

पिंपरी-चिंचवड शहराची २०३१ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहीत धरुन राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून अनुक्रमे ३६. ८७० दशलक्ष घनमीटर प्रतिदिन आणि ६०. ७९१ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन असा एकूण ९७. ६६ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन पाणी कोटा आरक्षीत केला आहे.
दरम्यान, पुन:र्स्थापना खर्चाबाबत शासन स्तरावर निर्णय न झाल्यामुळे करारनामा करण्यात तांत्रित अडचण निर्माण झाली. परिणामी, शासनाकडून पाणीकोटा रद्द करण्यात आला होता. यावर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पाणी आरक्षणासाठी फेर प्रस्ताव सादर केला. त्याला मान्यता मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कामाला गती दिली आहे.
आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने विकसित होणाऱ्या चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी, मोशीसह शहराच्या परिसरात आरक्षित पाण्यावर प्रक्रिया करुन पाणीपुरवठा केला जाणार आहे.

डिसेंबर २०२१ अखेर शहरवासीयांना पाणी : आमदार लांडगे
आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर पिंपरी-चिंचवड शहरावरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होणार आहे. जॅकवेल संदर्भात भूसंपादनात काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, त्यावर तोडगा निघाला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत ‘रॉ वॉटर’ उपलब्ध होईल. त्यावर प्रक्रिया करुन शहरवासीयांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा डिसेंबरअखेर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button