TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नदी पुनरुज्जीवनसह प्रलंबित प्रकल्पांना मिळणार गती !

  • पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सकारात्मक आश्वासन
  • भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी । प्रतिनिधी
इंद्रायणी, पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या ‘कन्सेप्ट मास्टर प्लॅन’ला महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण कमिटीची मान्यता घेण्यासह पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विविध प्रकल्पांना गती देण्याबाबत पुणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.
पुणे येथील विधान भवनमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
आमदार लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंद्रायणी व पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या ‘कन्सेप्ट मास्टर प्लॅन’साठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण कमिटीची मान्यता घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क विकसित करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक लावावी.
यासह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत १९७२ ते १९८३ या कालावधीत स्थानिक भूमिपुत्रांच्या संदादित केलेल्या जमिनंचा परताव्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. तसेच, पिंपरी- चिंचवड न्यायालयाला जागा उपलब्ध झाली असून, निधीची उपलब्धता करणे अपेक्षीत आहे. यासह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकामास गती देण्याबाबतही आमदार लांडगे यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
**
पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारास मंजुरी हवी : आमदार लांडगे
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वयीत झाला असून, आता पिंपरी ते निगडीपर्यंत आणि हिंजवडी ते चाकण मार्गाबाबत प्रस्ताव तयार केला असून, त्याला मंजुरी मिळाली पाहिजे. महावितरण संबंधित मोशी सफारी पार्क येथे सब स्टेशन उभारणे गरजचे आहे. त्यामुळे जाधववाडी, मोशी, डूडूळगाव, वडमुखवाडी, आळंदी, चोविसावाडी, चिखली या भागातील वीज पुरवठा सुरळीत करता येईल. तसेच, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली येथे अतिउच्चदाब सबस्टेशन उभारल्यास चऱ्होली गाव, दिघी, लोहगाव या भागातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यासह भोसरी मतदार संघातील महावितरण संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
**
विविध प्रलंबित विषयांसाठी पालकमंत्र्यांना साकडे…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ (मौजे तुळापूर ता. हवेली) आणि समाधी स्थळ (वढू बु. ता. शिरुर) विकास आराखडा मंजूर करण्यात यावा. त्याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारण्यास गती द्यावी. पिंपरी येथील फुलबाजारासाठी शेजारील जागा उपलब्ध करणे. पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाकरिता निधी उपलब्ध व्हावा. त्रिवेणीनगर ते रावेत स्पाईन रोड बाधित नागरिकांना पर्यायी भूखंड वाटप, महापालिका मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करणेकामी निधी मिळावा, प्रस्तावित संविधान भवनच्या कामाला गती द्यावी तसेच तळवडे ते चऱ्होली नदीपात्रातून रस्ता विकसित करुन रेसिडेन्सिअल कॉरिडॉर व इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात यावा यासाठी संबंधित विभागांना आदेश करावेत, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button