Uncategorizedताज्या घडामोडीमुंबईविदर्भ

अकोला लोहमार्ग पोलिसांनी आज अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा मेलमधून आलेले कोट्यावधी रुपयांचे सोने आणि चांदी चौकशीसाठी ताब्यात

अकोला: अकोला लोहमार्ग पोलिसांनी आज अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा मेलमधून आलेले कोट्यावधी रुपयांचे सोने आणि चांदी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तब्बल दोन किलो सोनं आणि सुमारे १०० किलो चांदी आहे. आंगडिया कुरीअर सर्विसने हे सोनं-चांदी अकोल्यात आलं आहे. आता हे सोनं-चांदी कुणाचं आहे? या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाले असून सोने-चांदीच्या संदर्भातील कागदपत्र पोलिसांना दाखविले जात आहे .

अकोला लोहमार्ग पोलिसांनी आज अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई-हावडा मेल  या रेल्वेत प्रवास करणाऱ्या शुभम नामक व्यक्तीजवळ जड बॅग दिसली. यादरम्यान रेल्वेत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र, त्याने बॅगच्या तपासणीसाठी नकार दिला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मग त्याच्या बॅगची झडती घेतली असता, असं काही आढळलं की पोलीसही ते पाहून चक्रावले.

पोलिसांना यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी आढळून आली. पोलिसांनी या संदर्भात त्याला अधिक विचारणा केली असता त्याने आपण आंगडिया कुरीअर सर्विसचा काम करतोय आणि पार्सल अकोल्यातील आहे, असं उत्तर पोलिसांना दिलेत. यानंतर पोलीस त्याला घेवून आरपीएफ ठाण्यात घेऊन गेले. याची माहिती आंगडिया कुरीअर सर्विसच्या अधिकाऱ्यांना देताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक इथं दाखल झाले. पोलिसांनी सोना आणि चांदी यांची तपासणी केली असता त्याचं वजन सुमारे २ किलो सोनं (2 kg gold) आणि ९० ते १०० किलो चांदी (100 kg silver) असे भरले. सध्या पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे आणि संबंधित जीएसटी विभाग यासह इतर विभागांना माहिती दिली आहे. पोलीस आणि सबंधित विभाग हे सराफा व्यवसायिकाकडून सोने-चांदीच्या बिलाचे कागदपत्र चैक करत आहे. तरीही नेमकं हे सोनं आणि चांदी कुणाचं याची माहिती मिळू शकलेली नाही. कारण, काही सोनं-चांदीचे कागद पत्रांची पूर्तता झाली असली तरीही इतर सोनं-चांदीची कागदपत्र तपासणी सुरु आहे.

या मालाच्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी म्हणजेचं सर्व गोष्टी निष्पन्न झाल्यास ते परत केल्या जाईल. मात्र, या संदर्भात सध्या पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाहीये. फक्त चौकशीसाठी हे सोनं ताब्यात घेतलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button