breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Koo कडून नोकरकपात; ३० टक्के कर्मचारी काढून टाकले

Koo App : Twitter चा प्रतिस्पर्धी असलेल्या Koo ने आर्थिक कारण देत ३० टक्के कर्मऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ट्विटरचा भारतीय प्रतिस्पर्धी म्हणून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo पुढे आले होते. पण Koo ने अलिकडील काही महिन्यांत त्यांच्या जवळपास एक तृतीयांश कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. कारण कंपनी तोट्यात आली असून ती निधी उभारण्यास असमर्थ ठरली असल्याचे समजते.

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या मायक्रोब्लॉगिंग अॅपने त्यांच्या सुमारे २६० कर्मचाऱ्यांपैकी ३० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. सध्या जागतिक भावना वाढीपेक्षा कार्यक्षमतेवर अधिक केंद्रित आहे आणि व्यवसायांना युनिट अर्थशास्त्र सिद्ध करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

Koo कडे ६ कोटीहून अधिक डाउनलोडसह चांगले भांडवल आहे. कंपनी कमाईच्या प्रयोगांसह फायदेशीर होण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं Koo चे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button