breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

#PCMC: निगडी उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत; उद्घाटनावरून भाजप व राष्ट्रवादीमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे

पिंपरी |

बराच काळ रखडलेल्या निगडीतील बहुचर्चित आणि बहुखर्चिक उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण झाली असतानाही त्याचे उद्घाटन कोणी करायचे, यावरून सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने संघर्षांची चिन्हे आहेत. कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडले आहे. विलंबामुळे या मार्गावरून दररोज जाणाऱ्या लाखभर वाहनस्वारांना दीड ते अडीच किलोमीटरचा वळसा पडतो आहे. या रहदारीचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याने तातडीने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची त्यांची मागणी आहे. पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार असणाऱ्या निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल तसेच वर्तुळाकार रस्ता असा सुमारे ९० कोटी खर्चाचा एकत्रित प्रकल्प राबवण्यात येत आहे. विविध कारणास्तव बराच काळ रखडलेल्या या प्रकल्पाचे काम ३१ मे रोजी पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना कळवली.

मात्र, २२ दिवस ओलांडल्यानंतरही उद्घाटनाचे नियोजन झालेले नाही. वाहतुकीसाठी पूल खुला होत नसल्याने नागरिकांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रकल्पांचे श्रेय घेण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुना वाद असून त्यांच्यात यापूर्वी अनेकदा संघर्ष झाल्याचे शहरवासीयांनी अनुभवले आहे. याही वेळी तशीच परिस्थिती दिसते आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री अजित पवार यापैकी कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे की दोघांनाही आमंत्रित करायचे याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. राष्ट्रवादी पवारांसाठी आग्रही आहे. फडणवीस यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित रहावे, असा प्रयत्न भाजप वर्तुळात सुरू आहे.

  • भाजप-राष्ट्रवादी श्रेयवाद

या उड्डाणपुलावरील पुणे तसेच मुंबईकडे जाणारे मार्ग १० डिसेंबर २०२० ला सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. तेव्हा राष्ट्रवादीने रात्रीत उद्घाटन उरकून घेतले. दुसऱ्या दिवशी, सत्ताधारी भाजपला महापौरांच्या हस्ते उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण करावी लागली. आता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनावर पुन्हा श्रेयवादाचे सावट आहे.

  • ..अन्यथा मनसे स्टाईलने उद्घाटन करू

निगडी, प्राधिकरणातील रहिवास्यांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढणार्या या महत्वाकांशी उड्डाणपूलासाठी मनसे आग्रही होती. या पूलाच्या कामासाठी आम्ही कायम पाठपुरावा केला आहे. कोरोनामुळे पूलाच्या कामाला विलंब झालयं. दोन वर्षे येथील नागरिकांनी हे अडथळे सहन केलेत. आता उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात उद्घाटनावरून श्रेयवाद सुरू असेल तर आम्ही मनसे स्टाईलने याचे उद्घाटन करू.

              ‘सचिन चिखले – शहराध्यक्ष मनसे’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button