breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

Bhopal Gas Tragedy; भोपाळ गॅस दुर्घटनेस 36 वर्ष पूर्ण नक्की काय झालं

मुंबई – 3 डिसेंबर 1984 ची काळी रात्रं ज्याला मानव इतिहासात अत्यंत दुर्दैवी घटना समजली जाते त्या भोपाळ वायू दुर्घटनेस आज 36 वर्ष पूर्ण झाली. हजारो निष्पाप लोकांचे बळी घेणारी ती घटना.

काय घडलं

मध्ये प्रदेशातील भोपाळ मधील युनियन कार्बाइड फॅक्टरीतून 3 डिसेंबर 1984 च्या पहाटे काळाने घात केला. युनियन कार्बाइडच्या प्लांट सीमधून पहाटेच्या सुमारास गॅस गळती सुरू झाली.

विषारी मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आला. रासायनिक प्रक्रियेमुळे टँकमध्ये दाब निर्माण होऊन टाकी उघडली गेली. बघताबघता वायू आसपासच्या झोपडपट्टीत पसरला आणि रात्रीच्या गाढ झोपेत असलेल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला.

Bhopal gas Tragedy 3 December 1984  completes 36 years what happened

याची तीव्रता आणखी वाढल्याने तेथील लोक अक्षरशः श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. परिणामी गळतीमुळे लोकांचा जीव गुदमरू लागला. सरकारी आकड्यांनुसार या दुर्घटनेत काही मिनिटांत सुमारे 3000 लोकांचा जीव गेला.

अवश्य वाचा – पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : निकालापूर्वीच अरुण लाड यांच्या अभिनंदनाचे बॅनर

डॉक्टरांना काय उपचार द्यावा हे कळत नव्हते

Bhopal gas Tragedy 3 December 1984  completes 36 years what happened

हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली. जखमी लोकांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या, काहींचे डोळे चुरचुरत होते, काहींना अंशतः अंधत्व आले होते. रूग्णालयात जागाच शिल्लक राहीली नाही. हॉस्पिटमधील डॉक्टरांना यावर काय उपचार द्यावा हे ही कळत नव्हते. कारण याआधी असं कधी काही घडलं नव्हतं.  

अवश्य वाचा – विधान परिषद निवडणूक सहा जागांचा आज होणार फैसला!

सरकारी आकड्यांनुसार

सरकारी आकड्यांनुसार या दुर्घटनेत 15,000 लोकांचा मृत्यू झाला. पाच लाखांहून अधिक लोक जखमी झाले. यापुढेही लोकांना इतर आजारांना तोंड द्यावेच लागले.

पुढील पिढीमध्ये त्यांचे विपरित परिणाम

तब्बल आठ तासांनंतर भोपाळ शहर हे वायूमुक्त म्हणून जाहीर करण्यात आले. पण प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरात अजूनही विषारी द्रव्यांनी इथले पाणी दूषित असल्याचे अभ्यासांमधून दिसून आले आहे. या पाण्याचा तेथील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन पुढील पिढीमध्ये त्यांचे विपरित चित्र दिसले आहे. भोपाळ दुर्घटनेनंतर जन्मलेल्यांना अजूनही व्यंग असल्याचे दिसून आले आहे.

अवश्य वाचा – इंटरपोलकडून 194 देशांना अलर्ट, COVID 19 vaccinesच्या बनावट लस पुरवण्याची भीती केली व्यक्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button