breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पिंपरीत केलेली अतिक्रमण कारवाई बेकायदेशीर?; टपरी पथारी हातगाडी पंचायतचा आक्षेप

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वतीने अतिरीक्त आयुक्तांच्या आदेशाने  आज भाजी विक्रेत्यावर पिंपरीत कारवाई करण्यात आली. याबाबत विचारणा केली असता करोनाबाबत सुचना देवून ही या ठिकाणी बाजी घेण्यासाठी गर्दी केली जात असल्याने अतिरीक्त आयुक्त अजित पवार यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली असे सांगितले आहे.

 याबाबत भाजी विक्रते असे सांगत आहेत की शासन जीवण आवश्यक वस्तू भाजीपाला इ. विक्री करण्यास परवानगी आहे उलट जीवण आवश्यक वस्तू विक्री बंद करु नये. येवडेच काय तर मार्केटयार्ड मध्ये आलेला भाजीपाला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी देण्यात येत आहे असे असताना पिंपरी मंडई येथे झालेली कारवाई हि अन्याय कारक आहे , असे टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे म्हणले या बाबत आयुक्त  श्रवण हर्डीकर , यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता गर्दी झाल्या मुळे कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे , 

मुळात कारवाई केलेले सर्व टपरी पथारी धारक यांचा फेरीवाले धोरणात सर्वे झाला आहे , आणि त्यांना महानगरपालिका वतीने लायसन्स देखिल देण्यात आहे , आहे , 

पिंपरी विभागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू फळभाजी पुरवणे हे प्रशासनाचे काम असून मुंबई पुणे आदी ठिकाणी मोकळे मैदान  उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांना फळभाजी पुरवले जात आहेत ,

परंतु पिंपरी-चिंचवड शहरात मात्र याउलट आणि विरुद्ध काम सुरू असून पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग करून बाळाच्या जीवावरती पिंपरी येथील फळभाजी विक्रेत्यांवर  अमानुषपणे कारवाई करण्यात आली आहे ही अत्यंत चुकीची कारवाई असून या कारवाईविरोधात मध्ये तक्रार करणार असल्याचे टपरी पथारी हातगाडी पंचायत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रमेश शिंदे यांनी सांगितले असून याबाबत लवकरच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री नगर विकास मंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असून याबद्दल कायद्याचा भंग झाला असल्यास संबंधित अधिकारी यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे रमेश शिंदे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button