breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना विरुद्ध लढाई : पिंपरी-चिंचवडमधील अतिउत्साही नगरसेवकांना महापालिका आयुक्तांची चपराक; काय आदेश दिला वाचा!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भात रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांवर ओढावलेल्या महामारीच्या संकाटात संधी शोधून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी ‘शुगर कोटेड’कडू गोळी देत चांगलीच चपराक दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नगरसेवकाने, लोकप्रतिनिधींनी किंवा खासगी व्यक्तीने वैयक्तिक पातळीवर औषध फवारणी करणे बेकायदेशीर आहे. प्रशासन शास्त्रोक्त पद्घतीने औषध फवारणी करीत आहे. त्यामुळे कोणीही वैयक्तिक पातळीवर जोखिम घेवू नये, असे आवाहन वजा निर्देश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत.

आयुक्त हर्डिकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन करताना म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (कोविड – १९) विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून त्याकरिता उपाययोजना म्हणून काही नागरिकांकडून, खाजगी संस्थांकडून तसेच सन्माननीय नगरसदस्यांकडून त्यांचे परिसरामध्ये स्वेच्छेने औषध फवारणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करणे बेकायदेशीर असून कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फवारणी करणेस परवानगी नाही.

            कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून औषध फवारणी करण्याची आवश्यकता नाही.

            तरी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी प्राधान्याने औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच, आरोग्य विभागामार्फत करण्यात येणारी औषध फवारणी ही शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येत असल्याने त्याकरिता कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन कर्मचा-यांना करु नये. सबब कोणत्याही नागरिक, खाजगी संस्था अथवा सन्माननीय सदस्यांनी सार्वजनिक परिसरामध्ये औषध फवारणीची कार्यवाही करु नये.

          त्यामुळे शहरातील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी जोखिम पत्करुन वैयक्तिक पातळीवर औषध फवारणी करण्यापासून परावृत्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button