breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: धक्कादायक! नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृतांबाबत अत्यंत काटोकोर नियम आहेत. मात्र, नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असतानाही 65 वर्षीय महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचं समोर आलं आहे. यातून जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे तब्बल 7 तास या रुग्णाचा मृतदेह तिच्या फुलेनगरमधील राहत्या घरात पडून होता.

मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णलयात जाऊन याविषयी जाब विचारला यानंतर डॉक्टरांनी मृतदेह पुन्हा हॉस्पिटलला आणून द्या असं सांगितलं होत. शेवटी जिल्हा रुग्णालयाने रात्री 1 वाजता आपलं पथक पाठवून राहत्या घरातून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली. मात्र, तब्बल 7 तास मृतदेहासोबत राहिलेल्या कुटुंबियांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. आता आमच्या जीवाला धोका झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल मृत कोरोना रुग्णाचे नातेवाईक विचारत आहेत.

दरम्यान, नाशिकमध्ये रविवारी (21 जून) 108 कोरोना बाधित रुग्ण आढळले. आत्तापर्यंत येथे 156 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. नाशिक शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1209 वर पोहचली आहे. एकूण 62 कोरोना रुग्णाचे मृत्यू झाले आहेत. उपचारानंतर बरे झाल्याने 504 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 643 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 2766 वर गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button