breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : उर्दू व हिंदी शाळेच्या समस्या तातडीने सोडवा; उपमहापौर तुषार हिंगे यांचा महापालिका प्रशासनाला आदेश

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील उर्दू व हिंदी माध्यमाच्या सर्व शाळांच्या समस्या तातडीने सोडवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश उपमहापौर तुषार हिंगे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

या संदर्भात शुक्रवारी (दि.27) झालेल्या बैठकीस  अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,  शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी ज्योस्त्ना शिंदे, माध्यमिक विभागाचे अधिकारी तसेच, पिंपरी -चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे व पिं.चिं.मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अखिल मुजावर, गुलाम महंम्मद शेख, अंजना गायकवाड, मशमुम नझीर, शब्बीर शेख व रईफ कुरेशी आदी उपस्थित होते.

उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले की, उर्दू शाळेतील शिक्षकांची भरती करावी. लवकरात-लवकर रोस्टर तपासणी करून घ्यावी. मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात. जाधववाडी येथील उर्दू शाळेस खोल्या उपलब्ध करून द्याव्यात. माध्यमिक शाळेंना यु.डी.आय. नंबर घेण्यात यावा. तासिका शिक्षक नियुक्त करणे. वेळेवर पगार दिला जावा. पी.टी. व चित्रकला शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. कासारवाडी शाळेत 8 वी ते 10 वीचे वर्ग सुरू करण्यात यावेत. शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करण्यात यावेत. पालक-शिक्षक सभा नियमितपणे घेण्यात याव्यात, असा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.  या प्रकरणी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे आश्‍वासन हिंगे यांनी दिले. पमहापौर तुषार हिंगे व अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी प्राथमिक  व माध्यमिक विभागाच्या अधिकार्‍यांना वेळेची मर्यादा देऊन वरील सर्व प्रश्न सोडविण्याचा सूचना केल्या.

उर्दू शाळेचे प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घेतल्याबद्दल पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष-अखिल मुजावर व त्यांचे इतर सहकारी यांनी उपमहापौर हिंगे यांचे आभार मानले. या बैठकीमुळे उर्दू शाळेचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असे समाधान त्यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button