breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

NCP : ‘मावळ’वीर सुनील शेळके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये!

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘जायंट किलर’ ठरलेले आमदार सुनील शेळके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘गुडबॉक्स’ मधील म्हणून चर्चेत आहेत. त्यामुळे मावळमधील विकासकामांना आता गती मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईतील विधानभवन परिसरात वर्दळ दिसते. नवोदित आमदार सुनील शेळके आणि अजित पवार यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झालेली पहायला मिळते. शुक्रवारी मंत्रालयातील चित्र बोलके होते. अत्यंत व्यक्त वेळापत्रकातही उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील शेळके यांच्यासोबत गांभीर्यपूर्वक चर्चा करताना दिसत होते.

मावळचा गड भाजपकडून ताब्यात घेण्यात अजित पवार यांचा ‘शिलेदार’ म्हणून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार यांनी दिलेल्या संधीचे सोने करीत शेळके यांनी मावळ विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकली. त्यानंतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शेळके सरसावले आहेत.

शुक्रवारी अजित पवार यांच्याशी झालेल्या विविध मुद्यांवरील चर्चेनंतर आमदा सुनील शेळके यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले आमदार सुनील शेळके?

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार हे सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. प्रशासनावरील जबरदस्त पकड, रोखठोकपणा, स्पष्टवक्तेपणा, पारदर्शी कारभार यामुळे सर्वांनाच दादांच्या कार्यशैलीचे कौतुक वाटते. जनसामान्यांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे. किंबहुना त्या मुद्द्यावर ते अत्यंत संवेदनशील बनतात. त्यांची वक्‍तृत्वशैली सर्वसामान्यांना आपलेसे करणारी आहे. त्यांच्या या शैलीस विनोदाची सूक्ष्म झालर असते.विरोधकांनी केलेली टीका ते खिलाडूवृत्तीने घेतात.त्यामुळे सर्वसामान्यांना दादा आपलेसे वाटतात.गेल्या 25 वर्षांत कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ऊर्जा आदी खाती सांभाळताना त्यांनी प्रत्येक खात्यावर आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे.आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या धोरणांचा विस्तार व प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्याची दुरदृष्टी दादांकडे आहे. आज असंख्य नवतरूण आदरणीय दादांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन विधायक व सकारात्मक राजकारणात येत आहेत, हे चित्र आशादायी आहे.
आगामी काळात दादा धडाकेबाज निर्णय घेऊन राज्यात असणारी बेरोजगारी, अर्धवट प्रकल्प आणि योजनांचा ढिसाळपणा नाहीसा करतील आणि राज्याचा गतिमान विकास होईल यात शंकाच नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button