पिंपरी / चिंचवड

बोलण्यासाठी दिलेला मोबाईल घेऊन तोंडओळखीचा मित्र पसार

पिंपरी l प्रतिनिधी

तोंडओळखीच्या व्यक्तीला थोडा वेळ बोलण्यासाठी दिलेला मोबाईल फोन तो व्यक्ती घेऊन गेला. हा प्रकार शनिवारी (दि. 29) रात्री आठ ते साडेआठ वाजता तळवडे चौक येथे घडला.

इम्तियाज इसाक शेख (वय 41, रा. मामुर्डी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 31) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरबाज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रिहान हा शनिवारी रात्री आठ वाजता शीतळानगर मामुर्डी येथील मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी गेला होता. औषधे घेऊन येत असताना त्याच्या तोंडओळखीचा मुलगा आरोपी अरबाज खान याने थोडा वेळ बोलण्यासाठी रिहानचा मोबाईल फोन घेतला. त्यानंतर अरबाज खान रिहानचा 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन परत न देता घेऊन गेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button