पिंपरी / चिंचवड

बांधकाम साईट वर कामगाराचा मृत्यू : बिल्डरसह लेबर सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

बांधकाम साईटवर काम करत असताना पहिल्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 26 डिसेंबर 2021 रोजी शिवार चौक पिंपळे सौदागर येथील जी के कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटवर घडली. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याबाबत तपास केल्यानंतर निष्काळजीपणे मृत्यू घडविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू उर्फ पितल पंकज चक्रवर्ती (वय 25, रा. बागुला नादिया, पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विनोद साळवे यांनी सोमवारी (दि. 31) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जी के बिल्डर्स, लेबर सुपरवायजर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर 2021 रोजी सांगवी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत झाल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यात संबंधित कामगाराचा मृत्यू हा अकस्मात नसून तो निष्काळजीपणे घडवला आहे.

जी के कन्स्ट्रक्शन साईवरील मुख्य बिल्डर्स वलेबर सुपरवायजर यांनी कन्स्ट्रक्शन साईटवर कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे काम करताना कामगार राजू चक्रवर्ती हा पहिल्या मजल्यावरून खाली पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक बी आर गोसावी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button