breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आई-वडिलांचं छत्र हरपलं, अनाथ लेकीसाठी पालकमंत्री बच्चू कडू झाले ‘बाप’, लेकीच केलं कन्यादान

अकोला : सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात मुलीचं लग्न म्हंटल की डोक्यावर डोंगर कोसळण्यासारखं असतं. मात्र, आई वडिलांचा छत्र हरविलेल्या दुर्गा या मुलीचा लग्नाचा संपूर्ण भार अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हॉटेल मराठाचे मालक मुरलीधर राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमी केला आहे. ते म्हणजे लग्नाचं संपूर्ण खर्च करून आज या हॉटेलमध्ये एका छत्र गमावलेल्या कन्येचा लग्नसोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या मुलीचे कन्यादान करून नव वर वधूला शुभाशीर्वाद दिले.

या सोहळ्यासाठी मुरलीधर राऊत यांनी आपलं हॉटेल, जेवण निशुल्क उपलब्ध करून दिलं. तर अमोल जमोदे यांनी डेकोरेशन तर महेश अंबेकर यांनी फोटोग्राफी निशुल्क करून देण्याची सोय केली. दुर्गाचे आई आणि वडील यांचा आजाराने मृत्यू झाला त्यानंतर ती आपल्या मोठया बहिणीकडे राहू लागली. बहिणीच लग्न कुठं लावावं, एवढा पैसा कुठून आणावा हा मुलीच्या बहिणीसाठी मोठा प्रश्न होता. मात्र, त्यांनी राऊत यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल ऐकलं आणि मुलीचा लग्न आज त्यांनी हाॅटेमध्ये पार पाडला. विशेष म्हणजे आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या मुलीचे कन्यादान करून नव वरवधूला शुभाशीर्वाद दिले.

मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हे प्रसंग मुलीच्या बापाच्या जीवनात कसोटीचे असतात ते यासाठीच दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील भास्करराव तराळे (रा. व्याळा ता. बाळापूर) आणि आई प्रमिला या दोघांचे छत्र हिरावले गेले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले त्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण यांच्या सुपूर्द केली. त्यानंतर व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचनही घेतले.

दरम्यान, मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते. तिचे मेव्हणे व मामा यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वर शोधण्यास सुरूवात केली. (कंचनपूर ता. खामगाव जि. बुलडाणा) चे विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रविण यांचा या स्थळासाठी होकार आला. आता लग्न समारंभ करुन देण्याचा प्रश्न आला. अकोल्यातील व्याळ्या जवळच हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्यावतीने करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. त्यानंतर हळूहळू एकेकाची मदत भेटू लागली आणि हा लग्नसोहळा पार पडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button