breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘आपलं ठरलंय जे करायचे ते रणांगणात’, गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचा नवनिर्वाचित खासदार मुन्ना महाडिकांना इशारा

सांगली : “माझी सवय आहे, जे काय करायचं ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी… आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितले आहे”, अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या नवनिर्वाचित खासदार मुन्ना महाडिक आणि कोल्हापूर भाजपाला इशारा दिला आहे. तसेच आजपर्यंतच्या जनतेतून ज्या निवडणूका झाल्या त्याचा कल सगळ्यांनाच माहिती आहे”, असा खोचक टोलाही त्यांनी महाडिक गटाला लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून सांगली ब्रँडिंग अंतर्गत शहरातील झुलेलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड नामफलकाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना भाजपा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाडिक गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

राज्यसभेत जे झालं ते विधान परिषदेत होणार नाही…!

विधानपरिषदेतील भाजपचे सर्व उमेदवार निवडून येणार, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या विधानावर बंटी पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, राज्यसभा निकालात जे घडलं तसेच विधान परिषद निकालातही घडेल, असं चंद्रकांत पाटलांना वाटत असेल, पण तसे काही घडणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आपण मैदानात कसे उतरतो हे सगळ्यांनाच माहिती आहे…!

तसेच धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेतील विजयावरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “त्यावर आपण जास्त भाष्य करणार नाही पण गेल्या पाच वर्षातील जनतेच्या निवडणुकीतून कल स्पष्ट झाला आहे. आपण जे काय करतो ते रणांगणात आल्यावर करतो. आपण मैदानात कसे उतरतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशा शब्दात कोल्हापूर भाजप आणि नूतन खासदार धनंजय महाडिक गटाला मंत्री पाटील यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

…तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे!

देहू येथील समारंभादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिलं नाही, यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “नेमकं त्या ठिकाणी व्यासपीठावर काय घडलं हे आपल्याला माहिती नाही. पण जर जाणून-बुजून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रोटोकॉलनुसार भाषण करण्यापासून अडवण्यात आले असेल तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button