breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गोवा फॉरवर्ड पार्टी ‘रालोआ’तून बाहेर

गोवा |

गोव्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे गोवाविरोधी असल्याचे कारण देत गोवा फॉरवर्ड पार्टीने (जीएफपी) मंगळवारी रालोआशी फारकत घेतली. तथापि, जीएफपीचे केवळ तीनच आमदार असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारच्या स्थैर्यावर कोणताही विपरीत परिणाम त्यामुळे होणार नाही.

गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सरकार स्थापन करताना २०१७ मध्ये जीएफपीने रालोआला पाठिंबा दिला होता. पर्रिकर यांच्या निधनानंतर जीएफपीच्या तीन मंत्र्यांना प्रमोद सावंत मंत्रिमंडळातून वगळण्यात आले तेव्हापासून आघाडीत कटुता निर्माण झाली होती. जीएफपीच्या राज्य कार्यकारिणीची आणि राजकीय व्यवहार समितीची मंगळवारी येथे बैठक झाली, त्यानंतर जीएफपीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी, पक्षाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले आहे.

वाचा- बारावी नापास बनला एमबीबीएस डॉक्टर; शिरुरमध्ये ‘देवमाणूस’चा पर्दाफाश

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button