breaking-newsक्रिडा

भारताचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश

भारत – न्युझीलंड हॉकी मालिका

बंगळुरू: भारतीय पुरुष हॉकी संघाने बंगळुरुत न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या हॉकी मालिकेत आपेल्या तीसऱ्या विजयाची नोंद केली असून या विजयासह भारताने मालिका 3-0 अशी जिकंत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. भारताने पाहुण्या न्यूझीलंड संघावर 4-0 ने मात केली. या मालिकेतला पहिला सामना भारताने 4-2 च्या फरकाने जिंकला होता. यानंतर दुसऱ्या सामनाही भारताने 2-1 ने जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. तर आजच्या सामन्यात भारताने न्युझीलंडचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत सहज विजय संपादन करत मालिका आपल्या नावे केली.

रुपिंदर पाल सिंगने सामन्याच्या 8व्याच मिनिटाला गोल नोंदवताना संघाला आक्रमक सुरूवात करुन दिली, त्यामुळे पहिल्यासत्रात भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली होती या गोलमुळे रुपिंदरचे मालिकेत 4 गोल पूर्ण झाले. तर लागलीच 15व्या मिनिटाला सुरेंदर कुमारने गोल करत संघाला पहिल्याच सत्रात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताच्या मध्यरक्षकांनी आक्रमक खेळ करत न्यऊझीलंडच्या खेळाडूंवर दबाव वाढवण्याचे महत्वपूर्न काम केले. त्यामुळे सामन्यातील पहिल्या दोन सत्रात न्यूझीलंडला गोल करण्याची एकही संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा संघ प्प्रचंड दडपणात आला होता. त्यानंतर सामन्याच्या 44व्या मिनिटाला अनुभवी सरदार सिंग आणि सिमरनजीत सिंग यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना चकवत चेंडू मनदीप सिंगच्या हवाली केला. या पासवर मनदीपने न्यूझीलंडच्या गोलकीपरला चकवत सुरेख गोल करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर आकाशदीप सिंगयाने 60व्या मिनिटाला गोल नोंदवत न्यूझीलंडच्या संघाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत भारताला 4-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी संघाच्या या कामगीरी बद्दल समाधान व्यक्त करताना सांगीतले की या मालिकेचा फायदा भारतीय संघाला आगामी आशिया चषक स्पर्धेत होणार असून आम्हाला यास्पर्धेतील तीन्ही सामन्यात संघामध्ये अनेक प्रयोग करता आले आणि आमच्या संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगीरी करत हे प्रयोग यशस्वी करुन दाखवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button