breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार बारणे यांनी साधला शेतमजुरांशी संवाद

मावळ – महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) मावळ भागात प्रचार दौरा केला.  प्रचार दौऱ्यात विविध गावांना भेटी दिल्या. तसेच धामणे येथील शेतमजुरांशी संवाद साधत बारणे यांनी त्यांच्या प्रचार पत्रकांचे वाटप केले.

यावेळी मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजामामी पोटफोडे, माजी आमदार रूपलेखा ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, प्रचारप्रमुख भास्करराव म्हाळसकर, युवा मोर्चाचे बाळासाहेब घोटकुले, रविंद्र भेगडे, बाबूलाल गराडे, अजित आगळे, भारत ठाकूर, किरण राक्षे, शांताराम मोहिते, रघुवीर शेलार, कैलास पानसरे, एकनाथराव टिळे, गणेश भेगडे, शरद हुलावळे, रामदास कलाटे आदी उपस्थित होते.

या प्रचार दौर्‍यात मामुर्डी, गहुंजे, शिरगाव, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, चांदखेड, आढले बुद्रुक, डोणे, शिवणे, मळवंडी, बऊर, सडवली, ओझर्डे, परंदवडी, बेबड ओहळ, धामणे आदी गावांना भेटी दिल्या. गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

मावळ लोकसभेची निवडणूक अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचारही शिगेला येऊन पोहोचला आहे. मावळ लोकसभा मतदार संघाच्या ग्रामीण आणि शहरी भागात सर्वत्र भेटीगाठी, सभा, बैठका, कोपरा सभा अशा सर्व मार्गांनी प्रचार केला जात आहे. उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी मावळ भागात प्रचार दौरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना मावळ भागात शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. त्यामुळे या भागातील शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज आहे. शिवसेना भाजप आणि महायुतीला इथल्या नागरिकांनी पसंती दिली असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button