ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

गायत्री स्कूल मोशी येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन

भोसरी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डेव्हलपमेंट फाऊंडेशन फॉर महाराष्ट्र, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ मोशी व कविता भोंगाळे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने आ. महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ” महाराष्ट्राचा दमदार युवा वक्ता ” जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल मोशी येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सह आयोजक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त कविता भोंगाळे यांनी केले आहे. वक्तृत्वाच्या आधारे तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अभिनव कल्पनेतून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढे राज्यस्तरीय स्पर्धेला पात्र ठरणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे चषक, प्रमाणपत्र व रोख प्रथम क्रमांक रोख ११,००० रुपये, द्वितीय क्रमांक रोख ७,००० रुपये, तृतीय क्रमांक रोख ५,००० रुपये, तसेच ५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ३,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

विश्वगुरू भारत, महाराष्ट्राच्या राजकिय आखाड्यातील खरा पैलवान, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी राजकीय स्थिरता, शेतकऱ्यांच्या हिताचा जलनीती, व्हिजन महाराष्ट्राच्या विकासाचे या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील १८ ते २८ या वयोगटातील स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. तसेच वक्तृत्व स्पर्धेत नाव नोंदणीसाठी ७७२००३२९९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. “महाराष्ट्राचा दमदार युवा वक्ता” जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डेव्हलपमेंट फाऊंडेशन फॉर महाराष्ट्र सह आयोजक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त कविता भोंगाळे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button