ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

चिखलीतील बिल्डर विरोधात सदनिका धारकांचे उपोषण

पाच वर्षांपासून अपूर्ण कामे व गैरसोयीचा आरोप; चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा पाठिंबा

पिंपरी ः विठ्ठल एम्पायर फेज -2 या सहकारी गृहरचना संस्थेचे बांधकाम विकसकांनी मागील पाच वर्षांपूर्वी पूर्ण केलेले आहे. परंतु सदर गृह प्रकल्पाच्या विकसकांनी अनेक कामे अर्धवट ठेवलेली आहेत.या सोसायटीला संरक्षक भिंत नाही, सोसायटीला जाण्यासाठी रस्ता नाही. सोसायटीच्या दोन्हीही लिफ्ट बंद अवस्थेत आहेत. सोसायटी सदस्यांना पार्किंगचे वाटप केलेले नाही. सोसायटीमध्ये प्रयोजित गार्डन विकसित केलेले नाही. सोसायटीला कुठलाही प्रकारचं गेट नाही एंट्रन्स नाही. सोसायटीला पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन नाहीत.

विकसकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बांधकाम परवानगी मध्ये घालून दिलेल्या अटी शर्ती पूर्ण केलेला नाहीत तसेच उर्वरित बांधकाम पूर्ण केल्यामुळे या गृह प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. पाच वर्षे झाले या गृहप्रकल्पातील सदस्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी) स्थापन केली नाही .अशा एक ना अनेक अडचणी या सोसायटीमध्ये आहेत.त्यामुळे सदनिकाधारक त्रस्त आहेत,याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रारी देऊनही विकसक समस्या निवारण करत नसल्याचा आरोप चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केला आहे.

याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत तसेच सोसायटी मार्फत वारंवार तक्रारी केलेले आहेत. भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार पैलवान श्री महेशदादा लांडगे यांच्याकडे देखील तक्रारी केलेले आहेत. भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेदादा लांडगे यांनी देखील या विकासका बरोबर तीन ते चार मीटिंग घेतलेले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या फेडरेशन मार्फत चार ते पाच वेळा मीटिंग झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर देखील याबाबत मीटिंग झालेले आहेत. परंतु या सर्व मीटिंग होत असताना देखील हे विकसक कोणत्याही प्रकारचे काम करत नव्हते.

त्यामुळे नाविलाजाने आम्हाला लोकशाही पद्धतीने उपोषणाला बसण्याची वेळ आली. या आमच्या न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसण्यासाठी आम्ही 9 सप्टेंबर 2023 रोजी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आयुक्त, पिंपरी चिंचवड शहराचे माननीय पोलीस आयुक्त, चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, माननीय आमदार महेशदादा लांडगे. यांना सर्वांना दिनांक 3 ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसण्याबाबत रीतसर नोटीस दिली होती. आणि या नोटीसी नुसार आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आमच्या सर्व महिला भगिनींना घेऊन चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या नेतृत्वाखाली उपोषणासाठी बसलो होतो.

त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री जांभळे पाटील, बांधकाम विभागाचे शहर अभियंता श्री निकम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.राजेंद्र राणे यांनी उपोषणकर्त्याच्या काही सदस्यांना तसेच फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांना याबाबत मीटिंगसाठी श्री राणे यांच्या दालनात बोलवले होते. या ठिकाणी या गृहप्रकल्पाचे विकसक यांना देखील त्यांनी बोलून घेतले होते. या मीटिंगमध्ये या गृहप्रकल्पाचे विकसक यांनी या वरील सर्व मागण्या मान्य करून सर्व काम करून देण्याचे लिखित मध्ये मान्य केल्यामुळे तसेच या मीटिंगच्या सभावृत्तांतामध्ये यांनी लिखित आश्वासन दिल्यामुळे आम्ही हे उपोषण बांधकाम विभागाचे शहर अभियंता श्री निकम साहेब, कार्यकारी अभियंता राणे साहेब , तसेच श्री मोहिते साहेब यांनी संबंधित विकसकावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आज आम्ही हे उपोषण स्थगित केले आहे. विकसकांनी दिलेल्या वेळेत जर ही सर्व काम पूर्ण केली नाहीत तर परत या सर्व सदस्यांना घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण केले जाईल,असे संजीवन सांगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना प्रशासनाने सोयी सुविधाकडे लक्ष द्यावे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील असे जे काही बांकाम व्यवसायिक आहेत की, ज्यांनी त्यांचा अगोदरचा गृहप्रकल्प पूर्ण केलेला नाही, त्याची काम पूर्ण केलेली नाहीत. अशा सर्व बांधकाम व्यवसायिकांना त्यांच्या चालू असलेल्या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण करून बांधकाम पूर्णत्वाचे दाखले घेतल्याशिवाय त्यांच्या नवीन कोणत्याही गृहप्रकल्पास मंजुरी देऊ नये. किंवा चालू असलेल्या कोणत्याही गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्यात येऊ नयेत. तसेच या विठ्ठल एम्पायर फेज -2 च्या विकसकावर देखील योग्य ती कारवाई करावी

संजीवन सांगळे ,
अध्यक्ष ,चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button