breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रत्युत्तर; म्हणाले,..

कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वात मोठा मुद्दा साप आहे

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विषारी सापाशी केली होती. दरम्यान, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मी भ्रष्टाचारविरोधात लढत आहे, याचा सर्वात जास्त त्रास काँग्रेसला होत आहे. त्यामुळे काँग्रेसचा माझ्याबाबत तिरस्कार आणखी वाढत आहे. त्यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली आहे. आजकाल काँग्रेसचे लोक मला धमकी देत आहेत, ते म्हणत आहेत की, मोदी तुझी कबर खोदली जाईल. कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वात मोठा मुद्दा साप आहे.

ते माझी सापाशी तुलना करत आहेत आणि लोकांकडे मतं मागत आहेत. पण साप हा भगवान शंकराच्या गळ्यातील शोभनीय बाब आहेय माझ्यासाठी देशातील जनता देवाचं रूप आहे, ते शंकाराचंच स्वरूप आहे. त्यामुळे ईश्वररूपी जनतेच्या गळ्यातील साप बनणं मला मंजूरर आहे. पण मला माहीत आहे, कर्नाटकमधील जनता शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसला १० मे रोजी मतपेटीतून उत्तर देईल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button