breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात तुफान राडा; दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने

पुणे – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता. त्यानंतर दोन्ही नेते पुणे प्रथमच पुणे महापालिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र यांच्या या सभेत तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

वाचा :-विजय स्तंभ परिसर विकासासाठी आर्थिक अडचण येऊ देणार नाही, अजित पवारांची ग्वाही

नुकतचं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. हा कार्यक्रम सुरु असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली गेली. भाजपकडून जय श्री रामची घोषणा देण्यात येत होती. त्यानंतर राष्ट्रवादीने चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामनेही भिडले.

वाचा :-‘संभाजीनगर’चा वापर केवळ निवडणुकीपुरता’, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून भामा आसखेड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरुन जोरदार वाद सुरु आहे. याच वादावरुन हे कार्यकर्ते भिडले असावे, असे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याची काहीही माहिती समोर आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button