breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक

दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील सानग्रान भागात दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. ३४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. सुरक्षा पथकांनी आपली घेराबंदी केल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला.

सुरक्षा पथकांकडूनही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे असे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. सानग्रान भागातील गावामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी रविवारी रात्री शोध मोहिम सुरु केली.

ANI

@ANI

Shopian: Encounter breaks out between terrorists & security forces in Sangran village. More details awaited.

19 people are talking about this

दहशतवादी लपलेल्या घराला चारही बाजूंनी घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या चकमकीत कुठलीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. घरामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button