breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांचे नाव आदितीने उंचावले त्याचा अभिमान!

  • भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे यांचे मत

पिंपरी । प्रतिनिधी
महिलांनी आपल्या मनगटातील ताकद वेळोवेळी सिद्ध केली आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांनी गगनभरारी घेतलेली नाही. पिंपरी-चिंचवडमधल्या आदिती कटारे हिने ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आदितीने पिंपरी-चिंचवडकरांचे नाव उंचावले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, अशा भावना पिंपरी-चिंचवड शहर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे यांनी व्यक्त केल्या.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आदिती कटारे यांची भारतीय वायू सेनेमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे, सरचिटणीस कविता भोंगाळे, दिपाली धनोकार तसेच प्राधिकरण- चिंचवड स्टेशन मंडलाच्या अध्यक्षा दिपाली करंजकर उपस्थित होते.

आमदार निधीतून पोलिस स्टेशनला साहित्य…
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून संगणक व प्रिंटर असे साहित्य प्रभाग क्र.१८ मधील चिंचवड पोलीस स्टेशनला भेट देण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे ,पोलीस निरिक्षक विश्वजीत खुळे , भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, स्थानिक नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, ॲड. मोरेश्वर शेडगे स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button