breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी प्राधिकरणातील जलतरण तलाव खुला करा

पिंपरी : निगडी प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव चालू करण्याबाबत आयुक्त,उपायुक्त क्रीडा विभागाचे मीनानाथ दंडवते यांना बाळा दानवले उपाध्यक्ष मनसे पिंपरी चिंचवड शहर यांनी दिले. यावेळी जयसिंग भट उपस्थित होते.

निगडी प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव सुमारे तीन वर्षापासून प्रथम कोरोनामुळे महानगरपालिके कडून बंद करण्यात आला आहे. आजही हा तलाव दुरुस्तीच्या नावाखाली तीन वर्षापासून हा तलाव बंद अवस्थेत आहे.

कोरोना काळ संपला सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक तलाव पुर्वी प्रेमाने चालू केले आहे .पण निगडी प्राधिकरण मधील हा जलतरण तलाव आजपर्यंत चालू करण्यात आलेला नाही. लवकरच उन्हाळा चालू होत आहे, तसेच निगडी प्राधिकरण भागातील सर्व नागरिकांची प्रामुख्याने हा जलतरण तलाव लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी आहे. आठ दिवसांत हा जलतरण तलाव सुरू करावा.

हेही वाचा – टाटा समुहाचा विक्रम, ५ दिवसात कमावले २० हजार कोटी

हा जलतरंग तलाव खोल असल्याकारणाने या ठिकाणी दुर्घटना झाली होती तरी या संदर्भात काळजी घेऊन उपाययोजना करून त्यामध्ये,प्रामुख्याने पोहायला येणाऱ्या नागरिकांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी जादा प्रमाणात जीवरक्षक नेमावे. तलाव जास्त खोल आहे त्या ठिकाणी रोप लावावेत, व तलावाच्या खोल ठिकाणी पोहायला येणाऱ्यालाच सोडावे अशा प्रकारचे नियोजन करावे.

हा छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव प्रामुख्याने निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, रावेत व बिजलीनगर या भागातील नागरिकांना हा तलाव मध्य ठिकाणी असल्याकारणाने या भागातील सर्व नागरिकांना हा तलाव सोयीचा व जवळ आहे. तसेच लहान मुलांना आता उन्हाळ्यात सुट्ट्या चालू होणार आहे. विद्यार्थ्यांना पोहण्याचा सरावासाठी तलाव उपलब्ध होण्यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये हा जलतरण तलाव चालू करावा तसे लेखी स्वरूपात द्यावे. अन्यथा मनसेतर्फे खळ खट्याक आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button