breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोना लसीची चाचणी थांबवल्याने शेअर बाजारात घसरण

मुंबई – चीनसोबत सीमारेषेवरुन वाढलेल्या संघर्षामुळे दोन दिवस शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली होती. त्यातच कोरोनाची लस टोचलेली व्यक्ती आजारी पडल्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीची चाचणी थांबवल्याच्या वृत्तामुळे बुधवारीही बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत 243.51 अंकांची घसरण होत बाजार 38121.84 अंकांवर सुरू झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे निफ्टीत 79.70 अंकांची घसरण होत तो 11237.85 अंकांवर सुरू झाला.

हिंदुस्थान-चीनमध्ये वाढलेला तणाव, घसरलेला जीडीपी आणि जागतिक स्तरावरील आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. त्यातच आता सगळ्यांचे लक्ष अमेरिकेच्या कोरोना लसीकडे आहे. या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी लवकर पूर्ण होऊन लस बाजारात येण्याची अपेक्षा होती. मात्र, या चाचणीत लस टोचलेली व्यक्ती आजारी पडल्याने लसीच्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. त्या व्यक्तीला नेमका काय त्रास होतोय, याचा अभ्यास करून पुढील प्रक्रिया होणार असल्याने लस येण्यास विलंब होणार आहे. या घडामोडीचाही बाजारावर परिणाम झाल्याने शेअर बाजार कोसळला आहे.


लसीच्या चाचणीला स्थगिती दिल्याच्या वृत्ताने अमेरिकेसह युरोपीय शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेचा शेअर बाजार डाऊ जोंस मंगळवारी 632 अंकांच्या घसरणीवर बंद झाला होता. या घडमोडींमुळे आशियाई शेअर बाजारातही गुतंवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केला. त्यामुळे आशियाई शेअर बाजारातही घसरण झाली. त्याचा परिणाम देशाच्या शेअर बाजारावरही झाला आहे. बुधवारी बाजार सुरू होताच सर्व सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारीही निर्देशांकांत घसरण होत बाजार बंद झाला होता. तर बुधवारीही बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे. या आठवड्यात बाजारात चढ-उतार राहतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button