पिंपरी / चिंचवड

अपहार प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

पत्नीला लग्नात संसारोपयोगी मिळालेले साहित्य आणि मौल्यवान वस्तूंचा अपहार केला. तसेच विवाहितेच्या मालकीच्या घरात तिला येऊ दिले नाही, याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा ते 4 फेब्रुवारी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

आप्पाजी मारुती बोंगाळे (रा. पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. ते दोन वर्षांपासून विभक्त राहत होते. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी फिर्यादी त्यांच्या मालकीच्या फ्लॅटवर गेल्या त्यावेळी आरोपीने दार उघडले नाही. फिर्यादीला लग्नात आई, वडिलांकडून मिळालेले संसारोपयोगी वस्तू फ्लॅटमध्ये असून त्याचा आरोपीने अपहार केला. तसेच फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button