breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीतील कचरा डेपोला शनिवारी पुन्हा आग

पिंपरी |

मोशीतील कचरा डेपोला दहा दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना ताजी असताना शनिवारी (ता.१६) येथे पुन्हा आग लागली. ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या कचरा डेपोत शहरातील कचरा जमा होतो. यापूर्वीही येथे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ६ एप्रिलला देखील मोठी लागली होती. रात्री उशिरापर्यंत ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान शनिवारी रात्री येथे पुन्हा आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाच्या पिंपरी मुख्य केंद्रासह भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण उपकेंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग भडकत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. वारंवार येथे आग लागण्याचे प्रकार घडत असल्यामुळे त्यावर राजकारण देखील होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button