breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील गूगल इंडियाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

धमकी देणाऱ्याला हैद्राबादमधून केलं पोलिसांच्या अटक

पुणे : गुगल इंडियाचे पुण्यात कोरेगाव पार्क येथील असलेले ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा निनावी फोन मुंबईतील बीकेसी कार्यालयात आला होता. बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबईतील बीकेसी कार्यालयात शिवानंद नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो हैदराबाद येथे राहत असल्याचे सांगितले. हा फोन लँडलाईनवरून करण्यात आला होता. या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीला हैद्राबादमधून ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि अशात त्याने हा कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे आणि त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच गोष्टीचा राग मनात धरून या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून दारूच्या नशेत थेट गुगल चे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button