पिंपरी / चिंचवड

गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील श्री गणेश पानवाला ही टपरी चालवणा-या सुरज राजाराम मौर्या (वय 20, रा. पिंपळे सौदागर) याला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. मौर्या याने त्याच्या टपरीमधून प्रतिबंधित गुटखा आणि विदेशी सिगारेट विकल्या असल्याने त्याच्यावर मंगळवारी (दि. 1) सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

मौर्या याला विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा आणि विदेशी सिगारेट पुरवणा-या राजू पटेल नावाच्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक सचिन गोनटे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मुखाचा कर्करोग होऊन शारीरिक हानी होऊ शकते हे माहिती असूनही आरोपी मौर्या याने त्याच्या टपरीमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि वैज्ञानिक इशारा नसलेल्या विदेशी सिगारेट विक्रीसाठी ठेवल्या. हा माल आरोपी राजू पटेल याने पुरवला. याबाबत माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत मौर्या याला अटक केली आहे. त्याच्याकडून 46 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button