breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये आठ ते दहा वाहनांची तोडफोड; वेताळनगरमध्ये घबराट

पिंपरी |महाईन्यूज|

दहा जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, कोयते घेवून चिंचवडमध्ये आठ ते दहा वाहनांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (२७) रात्री वेताळनगर, चिंचवड येथे घडली.

आण्णा ऊर्फ ओंकार हजारे, ओंकार कसबे, मल्हारी दभडगे, आदित्य फाळके, लखन डोंगरे, भैय्या उर्फ तेजस वायदंडे व इतर दोन ते तीनजण (सर्व रा. वेताळनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. स्वानंद चंद्रकांत कांबळे वय- २०, रा.- वेताळनगर, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास हातात तलवारी, कोयते घेऊन तसेच दगडफेक करत सुमारे नऊ ते दहा गुंडांनी चिंचवड गावातील वेताळनगर परिसरात वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीच्या या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. “आमचे नुकसान भरून द्या, आरोपींना त्वरित अटक करा”, अशी मागणी या वेळी संतप्त नागरिकांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button