पिंपरी / चिंचवड

आईला मारहाण केली म्हणून भावावर कोयत्याने वार : हल्ला करणा-या भावाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

दारू पिऊन आईला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या भावावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 7) सकाळी मुळशी तालुक्यातील माणगाव येथे घडली.

ज्ञानेश्वर आनंद वाघुलकर असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई मैना आनंद वाघुलकर (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश आनंद वाघुलकर (वय 26 रा. माणगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर हा दारू पिऊन घरी आला. त्याने दारूच्या नशेत आईला शिवीगाळ केली आणि घर लावून मारहाण करण्यास सुरुवात केली. तो आईला मारहाण करत असताना फिर्यादी महिला यांचा तीन नंबरचा मुलगा गणेश हा दरवाजा उघडून हातात कोयता घेऊन तिथे आला. त्याने ज्ञानेश्वरच्या डोक्यात वार केले. त्यानंतर ज्ञानेश्वर हा स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर पळून गेला. गणेश त्याच्यामागे पळत गेला आणि पुन्हा ज्ञानेश्वरच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button