breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मास्क न घालता फिरणा-यांना आकारली जाणारी दंडाची रक्कम दोनशे रुपये करावी

  • भाजप नेते अमित गोरखे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरीबरोबरच कामगारनगरी देखील आहे. याठिकाणी राहणा-या कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विनामास्क फिरणा-या व्यक्तींवर कारवाई करून त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारला जातो. तो सामान्य कामगाराला परवडणारा नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी कामगारांसाठी दंडाची रक्कम 200 रुपये करावी, अशी मागणी राज्याचे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

यासंदर्भात गोरखे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. प्रशासनाने केलेला बिनामास्क फिरणा-यांसाठीचा निर्णय अतिशय चांगला आहे. सध्या पोलिसांमार्फत ही कार्यवाही चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक मजूर, गरीब, कामगार वर्ग दिवसभराचे काबाड कष्ट करून उपजीविका भागवतात. अशा गरीबांना ५०० रुपये दंडाची रक्कम अतिशय मोठी वाटते. दंड जरूर आकारावा परंतु, दंडाची रक्कम ५०० रुपये ऐवजी दोनशे रुपये करावी. जेणेकरून गरीब मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना आर्थिक झळ बसणार नाही, अशी मागणी गोरखे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button